नेपाळमध्ये रद्द करण्यात आला कपिलाचा कार्यक्रम

‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या आपल्या कॉमेडी शोच्या माध्यमातून अनेकांना निखळ आनंद देणारा कपिल शर्मा सध्या थोडा हिरमुसलाय... नेपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कपिलचा एक शो नुकताच रद्द करण्यात आलाय.

Updated: Dec 16, 2014, 12:04 PM IST
नेपाळमध्ये रद्द करण्यात आला कपिलाचा कार्यक्रम title=

नवी दिल्ली : ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या आपल्या कॉमेडी शोच्या माध्यमातून अनेकांना निखळ आनंद देणारा कपिल शर्मा सध्या थोडा हिरमुसलाय... नेपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कपिलचा एक शो नुकताच रद्द करण्यात आलाय.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी कपिल यापूर्वीच नेपाळमध्ये दाखल झाला होता. त्यानं नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराच्या परिसरातील आपला एक फोटोही सोशल वेबसाईटद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. नेपाळमधल्या पर्पल फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी कपिल रविवारीच नेपाळमध्ये सहभागी झालाय. 

कपिल परफॉर्म करणार असलेला ‘एनसेल’ हा एक म्युझिकल शो १३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता... यामध्ये, नेपाळचे गायक आणि कॉमेडियनही सहभागी होणार होते. तसंच, याचं कार्यक्रमासाठी भारताच्या कपिल शर्मायाच्यासोबतच सोनू निगमलाही पाचारण करण्यात आलं होतं. 


नेपाळमध्ये कपिल

परंतु, या कार्यक्रमाच्या एक दिवसअगोदरच हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगितलं. सुरक्षेच्या कारणामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. ज्या स्टेडियममध्ये हा शो होणार होता तिथं काही काम सुरू आहे आणि लोखंडाचे रॉड तसंच दगड-विटाही इथं अस्ताव्यस्थ पसरलेल्या असल्यामुळे, काहीही घडू शकतं. 

अशा वेळी सुरक्षेची खबरदारी म्हणून हा कार्यक्रमच रद्द करण्यात आलाय. पण, यामुळे या कलाकारांवर प्रेम करणारे त्यांचे चाहते मात्र हिरमुसलेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.