ऑस्कर अॅवॉर्ड सोहळ्याला दिमाखात सुरुवात

89 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरूवातचं अनोख्या पद्धतीनं झाली आहे. महेर्शाला अली हा अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे. मुनलाईट या बहुचर्चित चित्रपटासाठी अलीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. 

Updated: Feb 27, 2017, 09:07 AM IST
ऑस्कर अॅवॉर्ड सोहळ्याला दिमाखात सुरुवात title=

लॉस अँजिलिस : 89 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरूवातचं अनोख्या पद्धतीनं झाली आहे. महेर्शाला अली हा अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे. मुनलाईट या बहुचर्चित चित्रपटासाठी अलीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. 

मुनलाईट हा सिनेमा समलिंग मुलं वयात येत त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या स्थित्यंतरावर आधारित आहे...अलीनं या चित्रपटात अत्यंत दर्जेदार भूमिका वठवलीय... गेल्यावर्षीची सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अलीसिया विकेंडरच्या हस्ते अलीला यंदाचा ऑस्कर प्रदान करण्यात आला.

पाहा कोणाला मिळाला ऑस्कर पुरस्कार

ऑस्कर २०१७ : 'पायपर' ठरली सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला 'झुटोपिया'ला.
ऑस्कर २०१७ : 'द सेल्समन'ला सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा चित्रपटाचा पुरस्का
हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने बेस्ट प्रशासनाकडून ज्याडा बसेसची सेवा.
ऑस्कर २०१७ :'फेन्सेस' चित्रपटातील अभिनयासाठी व्हायोला डेव्हिसने पटकावला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार.
ऑस्कर २०१७ : 'हॅकसॉ रिज'ला सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंगचा ऑस्कर पुरस्कार
ऑस्कर २०१७ : 'अरायव्हल' चित्रपटासाठी सिल्व्हेन बेलेमरेला मिळाला बेस्ट साऊंड डिझाईनचा पुरस्कार.
ऑस्कर २०१७ : 'ओजे मेड इन अमेरिका’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेण्ट्री फिचर पुरस्कार
ऑस्कर २०१७ : 'फॅन्टॅस्टिक बिट' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार म्हणून कॉलिन एटवूडला मिळाला पुरस्कार.
ऑस्कर २०१७ : ' सुसाईड स्क्वाड'च्या टीमला सर्वोत्कृष्ट मेकअपसाठी पुरस्कार
ऑस्कर २०१७ : मूनलाईट सिनेमाताली व्यक्तिरेखेसाठी मेहर्शाला अलीला मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार.
ऑस्कर २०१७ : सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईनसाठी 'ला ला लॅण्ड'ला पुरस्कार