मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सध्या भलतीच बिझी झालीय. नुकतंच, कतरीनाला पेशंटच्या रुपात हॉस्पीटलमध्ये पाहिलं गेलंय.
कतरीना सध्या सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'बार बार देखो' या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. 'फॅन्टम' या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर तिनं लगेचच 'बार बार देखो' या चित्रपटाच्या शुटींगला लंडनमध्ये सुरुवात केली होती.
ग्लासगो इथं 'बार बार देखो' या चित्रपटाचं शुटींग उरकल्यानंतर लगेचच या सिनेमाचं पुढचं शूट गोवा इथं सुरू झालं... आणि कतरीना गोव्यात यावं लागलं... इथलं शूट उरकतंय की नाही तोवरच मुंबईला पुढच्या शूटींगची सगळी तयारी झाली होती...
मग काय, कतरीना मुंबईत पुढच्या शुटींगला सुरुवात करावी लागली... आणि इथंच कतरीना एका हॉस्पीटलमध्ये पेशंटच्या रुपात दिसली.
या हेक्टिक शेड्युलमुळे कतरीना आजारी पडलीय... असं तुम्हाला पहिल्यांदा वाटेल... पण, थांबा... काळजी करू नका...
कारण, हे याच सिनेमातील एका भागाचं शूट होतं. यावेळी, पेशंटच्या भूमिकेतील कतरीना हॉस्पीटलच्या गाऊनमध्ये दिसली... यावेळी तिच्या हातात बांगड्याही होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.