दिवाळीची पहाट उजळणार 'कट्यार काळजात घुसली'च्या प्रिमिअरनं...

झी स्टुडिओनं 'कट्यार काळजात घुसली'च्या रुपात प्रेक्षकांसाठी अनोखं दिवाळीचं गिफ्ट आणलंय... 

Updated: Nov 7, 2015, 11:54 AM IST
दिवाळीची पहाट उजळणार 'कट्यार काळजात घुसली'च्या प्रिमिअरनं... title=

मुंबई : झी स्टुडिओनं 'कट्यार काळजात घुसली'च्या रुपात प्रेक्षकांसाठी अनोखं दिवाळीचं गिफ्ट आणलंय... 

'सूर निरागस हो'चा स्वर्गीय सूर, घेई छंद मकरंदची अफलातून जुगलंबदी, तेजोनिधी लोह गोलच्या हरकती, दिल की तपीशमधून व्यक्त झालेली मनातील उद्विग्नता, मन मंदिरामधून दिसणारं गुरू शिष्याचं नातं अशा विविध भाव भावना गाण्यांमध्ये गुंफण्यासाठी 'कट्यार काळजात घुसली'चा प्रिमिअर सज्ज झालाय.

अधिक वाचा - 'कट्यार काळजात घुसली'ची ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

भारतीय शास्त्रीय संगीताची भरजरी परंपरा जपणाऱ्या आणि सुरांची विशेष मेजवानी असलेल्या या चित्रपटाची सुरूवातही एक खास परंपरा जपून होणार आहे ती म्हणजे दिवाळी पहाटद्वारे... अशीच एक दिवाळी पहाट रंगणार आहे 'कट्यार काळजात घुसली'च्या प्रिमिअरच्या निमित्तानं... 10 नोव्हेंबरला मुंबईत सकाळी 9.00 वाजता चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबतच सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर या खास प्रिमीयरला उपस्थिती लावणार आहेत.

आणखी वाचा - शंकर महादेवनचं 'सूर निरागस हो' हिट, अवघं बॉलिवूड पडलं प्रेमात

भारतीय शास्त्रीय संगीताची भरजरी परंपरा जपणाऱ्या आणि सुरांची विशेष मेजवानी असलेल्या या चित्रपटाची सुरूवातही एक खास परंपरा जपून होणार आहे ती म्हणजे दिवाळी पहाटद्वारे...

आणखी वाचा - 'कट्यार काळजात घुसली'चा ट्रेलर लॉन्च, काळजाला भिडणारा चित्रपट

12 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन यांच्यासह चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.