मुंबई : सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ कलम ४ व २१ प्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव पार्क परिसरात सिद्धार्थचे रेस्टॉरंट आहे. याच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन देत असल्याचा सिद्धार्थवर आरोप आहे.
कोरेगाव पार्क परिसरातील रेस्टॉरंटमधील स्मोकिंग झोनच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन दिला जात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. पोलिसांनी काही हुक्का मशीन जप्त केल्या आहेत. तसेच काही ग्राहकांना नोटीस बजावल्या आहेत.