मुंबई : काही दिवसांपूर्वीच वन नाईट स्टॅंड या सिनेमामध्ये बोल्ड आणि इंटीमेट सीन्समुळे सनी लिऑन आणि न्यारा बॅनर्जी या दोघी चर्चेत आल्या होत्या.
'फिल्मफेयर'च्या माहितीनुसार अभिनेत्री न्याराने हे मान्य केलं आहे की, बेडरुम सीन करतांना तिला अयोग्य वाटत होतं. हा सीन करण्यासाठी तिने अल्कोहोलची मदत घेतली होती. बोल्ड सीन करतांना ती नशेत होती.
न्याराने वन नाइट स्टँड सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव शेअर करतांना म्हटलं की, 'मला रात्री हे सीन शूट करायचे होते आणि सकाळी बंगळुरुसाठी फ्लाईट पकडायची होती. त्यामुळे युनिटमधील लोकांनी तिला शूटनंतर लिंबू पाणी दिलं कारण ती शुद्धीत यावी.