सहकलाकारांनंतर कपिलवर आता बॉलिवूडही नाराज

सुनिल ग्रोवर आणि इतर कलाकारांसोबत झालेला कपिलचा वाद काही थंड व्हायला तयार नाही. त्यातच आता बॉलिवूडचे काही कलाकारांनीदेखील कपिलच्या शोमध्ये यायला नकार दिलाय. 

Intern Intern | Updated: Mar 24, 2017, 04:22 PM IST
सहकलाकारांनंतर कपिलवर आता बॉलिवूडही नाराज title=

नवी दिल्ली : सुनिल ग्रोवर आणि इतर कलाकारांसोबत झालेला कपिलचा वाद काही थंड व्हायला तयार नाही. त्यातच आता बॉलिवूडचे काही कलाकारांनीदेखील कपिलच्या शोमध्ये यायला नकार दिलाय. 



या सहकलाकारांसोबत झालेला वाद इतक्या विकोपाला जाईल, अशी आशा कपिलनंही केली नसेल... एका एपिसोडच्या शुटसाठी त्याच्याकडे सध्या ना कलाकार आहेत... ना पाहुणे...



'स्पॉटबॉय'नं दिलेल्या माहितीनुसार, कपिलच्या या सवयीमुळे बॉलिवूडचे काही तारे त्याच्यावर नाराज आहेत आणि त्याचमुळे त्याला बुधवारचं शूट कॅन्सलही करावं लागलं. 



सुनिल ग्रोवर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनी कार्यक्रमाला जवळपास 'रामराम' ठोकलाय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी कपिलने राजू श्रीवास्तव, एहसान कुरैशी आणि सुनिल पाल यांना पाचारण केलं. मात्र, त्याच्या या युक्तीचाही काहीच फायदा झाला नसल्याचं दिसतंय.



मनोज वाजपेयी आणि तापसी पन्नूसोबतच्या त्याच्या नवीन शुटलाही अली असगर आणि सुगंधा मिश्राने यायला नकार दिला. आता तो फक्त किकू शारदा आणि रोशेलसोबत पूर्ण एपिसोड शूट करू शकत नाही.



याआधी एकदा 'बेगम जान' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या विद्या बालनला त्याने 6 तास वाट बघायला लावली होती. कपिलचं बॉलिवूड सेलिब्रिटींशी असलेलं वागणं कदाचित त्यांना खटकत असावं.



आता हे वाद कोणत्या टोकाला जाताहेत आणि त्यातून काय घडेल, हे येत्या काळातच बघावं लागेल