झी मराठीवर येतेय नवी मालिका

सुखी संसारासाठी मन जुळावी लागतात पत्रिका नव्हे या मेसेजवर आधारित 'पसंत आहे मुलगी' ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांना टाटाबायबाय करणार आहे.

Updated: Aug 1, 2016, 10:09 AM IST
झी मराठीवर येतेय नवी मालिका title=

मुंबई : सुखी संसारासाठी मन जुळावी लागतात पत्रिका नव्हे या मेसेजवर आधारित 'पसंत आहे मुलगी' ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांना टाटाबायबाय करणार आहे.

मालिका प्रसारित झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात मालिकेला गाशा गुंडाळावा लागतोय. या वर्षी २५ जानेवारीला ही मालिका प्रसारित झाली होती. रेशम प्रशांत आणि अभिषेक देशमुख यांची या मालिकेत मुख्य भूमिका आहे. 

पसंत आहे मुलगीच्या जागी २२ ऑगस्टपासून नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. माझ्या नवऱ्याची बायको असं या मालिकेचं नाव आहे. रात्री ८ वाजता ही मालिका प्रसारित होईल.