मुंबई : केतन मेहताचा 'मांझी-द माउंटेन मैन' या सिनेमाचं चित्रिकरण सुरू असतांना, अभिनेत्री राधिका आपटेला नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत रोमँटिक दृश्य देतांना अडचण येत आहे.
कारण राधिका आपटेला वाटतंय, नवाझुद्दीन सिद्दीकीला आपण आवडत नाही, कारण नवाझुद्दीन राधिकाशी बोलतही नाही. राधिका म्हणते, "सिनेमात नवाझुद्दीनशी प्रेम करणं फारच कठीण होऊन बसलं होतं, कारण जेव्हा शुटिंग असेल आणि रोमँटिक सीन असेल तेव्हा, नवाझुद्दीन शांत शांत राहत होता."
राधिकाने दिग्दर्शक केतन मेहता यांनाही सांगितलं की, "नवाझुद्दीनला मी हिरोईन म्हणून आवडत नाही का, ते माझ्याशी बोलत का नाही, तो एवढा काय शांत माणूस आहे."
मात्र केतन मेहता म्हणतात, "जेव्हा अॅक्शन म्हटलं जात असे, तेव्हा नवाझुद्दीनमधील रोमॅँटिक अंदाज तुम्हाला आपोआप पाहायला मिळेल".
नवाझुद्दीन गंमत करतांना म्हणाला, "जर राधिका सारखी अभिनेत्री असेल, तर मला रोमँटिंक सीन करायला आवडेल, आणि ज्या दिवशी शुटिंगमध्ये राधिकाचं काम नसेल, त्याही दिवशी मी दिग्दर्शकाला सांगेल, की राधिकांना बोलवा"
'मांझी-द माउंटेन मैन' हा सिनेमा २१ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.