VIDEO : पाकिस्तानी जाहिरातीत हे काय बोलून गेला नवाजुद्दीन...

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नुकताच शाहरुख खानसोबत 'रईस' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आला होता. आपल्या अभिनयाच्या हुकुमाच्या एक्क्यासाठी त्यानं लोकांकडून बरीच वाहवाही मिळवली. 

Updated: Feb 7, 2017, 11:23 AM IST
VIDEO : पाकिस्तानी जाहिरातीत हे काय बोलून गेला नवाजुद्दीन... title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नुकताच शाहरुख खानसोबत 'रईस' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आला होता. आपल्या अभिनयाच्या हुकुमाच्या एक्क्यासाठी त्यानं लोकांकडून बरीच वाहवाही मिळवली. 

त्याचा हा अभिनय फक्त देशातच नाही तर परदेशातही लोकांनी डोक्यावर घेतलाय. नवाजुद्दीन नुकताच एका पाकिस्तानी जाहिरातीतही झळकलाय. 

एअरकंडिशनरच्या या जाहिरातीत तो एका पीच्या भूमिकेत दिसतोय. पहिल्यांदाच नवाजुद्दीननं एखाद्या पाकिस्तानी जाहिरातीत काम केलंय. ही मजेशीर जाहिरात सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसतेय.