लंडन : चित्रपट अभिनेता नाना पाटेकर लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. ‘परिंदा’, ‘तिरंगा’ आणि ‘अब तक छप्पन’ साऱख्या सिनेमात आपल्या अभिनयाच्या जोरावर पुढे आलेले नाना पाटेकर हे, 17 जुलै रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
नाना पाटेकर यांची समृद्धी पोरे यांच्या 'हेमलकसा'च्या प्रिमियरसाठी प्रमुख उपस्थिती आहे.
या चित्रपटात मॅगसेस पुरस्कार विजेते डॉ.प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची प्रेरणादायी कहाणी मांडण्यात आली आहे.
यावर नाना पाटेकर यांनी म्हटलंय, हेमलकासा निवडण्यासाठी एलआयएफएफच्या निवड समितीचं कौतुक करतो, कारण त्यांनी दाखवून दिलं आहे की, फक्त हिरा ओळखतो त्यालाच रत्नपारखी म्हणता येईल.
हा फक्त चित्रपट नाहीय, तर जगासाठी प्रेरणादायी संदेश आहे. म्हणूनच मी लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलला आलो आहे, नाहीतर मी चित्रपट महोत्सवाची निमंत्रण टाळतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.