कंडोमचा डिझाइन ड्रेस परिधान केला मुग्धा गोडसेने

एचआयव्ही आणि एड्सविरोधात जनजागृतीसाठी मुंबईमध्ये २९ जानेवारी रोजी कंडोम फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील हा पहिला कंडोम फॅशन शो होता. 

Updated: Jan 30, 2015, 07:25 PM IST
कंडोमचा डिझाइन ड्रेस परिधान केला मुग्धा गोडसेने title=
सौजन्य - फेसबूक

मुंबई : एचआयव्ही आणि एड्सविरोधात जनजागृतीसाठी मुंबईमध्ये २९ जानेवारी रोजी कंडोम फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील हा पहिला कंडोम फॅशन शो होता. 

या फॅशन शोमध्ये देशातील अनेक मॉडेल्सने भाग घेतला होता. यात कंडोमने तयार केलेले ड्रेस परिधान करून रॅम्प वॉक केला. 

यात बॉलिवूड अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध मॉडेल मुग्धा गोडसे हिने शो स्टॉपर म्हणून काम केले. तिनेही कंडोमचा ड्रेस परिधान करून रॅम्प वॉ़क केला. 

२८ जानेवारीला मुग्धाने ट्वीट करून आपल्या फॅन्सला ही बातमी दिली. ट्विटनुसार पहिल्या कंडोम फॅशन शोमध्ये मी सहभागी होत आहे. याचा उद्देश एचआयव्ही आणि एड्सबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे. 

Showstopper at India's first condom fashion show @mugdhagodse267 outfit done by @WWINeetaLulla students @neeta_lulla pic.twitter.com/7qX9P3erqc

— Avneet Jotwani (@Avneeet) January 29, 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.