रिअल लाईफमध्ये अस्मिता-अभिचा साखरपुडा

सेटवर एकत्र काम करत असताना एखादी जोडी एकमेकांच्या प्रेमात पडते आणि रील लाईफमधील ही जोडी रिअल लाईफमध्ये एकमेकांचे जोडीदार झाल्याच्या घटना आतापर्यंत मालिका, चित्रपटात घडल्यात.

Updated: Aug 16, 2016, 04:15 PM IST
रिअल लाईफमध्ये अस्मिता-अभिचा साखरपुडा title=

मुंबई : सेटवर एकत्र काम करत असताना एखादी जोडी एकमेकांच्या प्रेमात पडते आणि रील लाईफमधील ही जोडी रिअल लाईफमध्ये एकमेकांचे जोडीदार झाल्याच्या घटना आतापर्यंत मालिका, चित्रपटात घडल्यात.

अशीच घटना अस्मिताच्या सेटवर घडलीये. झी मराठीवरील अस्मिता या मालिकेतील अस्मिता आणि अभिमान रिअल लाईफमध्ये एकमेकांचे जोडीदार बनलेत. अस्मिता अर्थात मयुरी वाघ आणि अभिमान म्हणजेच पियुष रानडे यांचा साखरपुडा नुकताच पार पडला.

गेल्या दोन वर्षांपासून मयुरी आणि पियुष एकमेकांसोबत काम करतायत. हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढू लागली. या मैत्रीमध्ये एकमेकांशी एकमेकांच्या गोष्टी शेअर होऊ लागल्या. 

ही मैत्री प्रेमात परिवर्तित झाली. या दोघांनी रिअल लाईफमध्येही एकत्र यावे अशी चाहत्यांची इच्छा होती. त्यामुळे चाहत्यांची इच्छा आणि घरच्यांचा सपोर्ट यामुळे दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. 

 

Rings of glory ❤️❤️

A photo posted by Piyush Ranade (@piyushakaabeer) on