सलमानच्या 'ट्यूबलाईट'चा फर्स्ट लूक रिलीज

सुल्तानच्या यशानंतर आता सलमान खान ट्यूबलाईट या कबीर खानच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Updated: Aug 15, 2016, 10:18 PM IST
सलमानच्या 'ट्यूबलाईट'चा फर्स्ट लूक रिलीज  title=

मुंबई : सुल्तानच्या यशानंतर आता सलमान खान ट्यूबलाईट या कबीर खानच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक कबीर खाननं शेअर केला आहे. 70 व्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत कबीरनं सलमानचा हा फोटो शेअर केला आहे. 

या लूकमध्ये सलमान सैनिकाच्या गणवेशामध्ये दिसत आहे. 1962 च्या भारत चीन युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये सलमानबरोबर चीनची प्रसिद्ध अभिनेत्री झूझू दिसणार आहे.