अमिताभ बच्चन यांनी केली नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट'ची प्रशंसा

 सुपरस्टार बिग बी यांचे मराठी चित्रपट आणि मराठी बद्दलचे प्रेम आज काल खूप प्रकर्षाने जाणवत आहे. सुपस्टार बिग बी यांनी नाना पाटेकरांचे आणि महेश मांजरेकर याचे आगमी नटसम्राट या चित्रपटासाठी तोंड भरून कौतुक केले आहे. 

Updated: Dec 11, 2015, 01:51 PM IST
अमिताभ बच्चन यांनी केली नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट'ची प्रशंसा title=

मुंबई :  सुपरस्टार बिग बी यांचे मराठी चित्रपट आणि मराठी बद्दलचे प्रेम आज काल खूप प्रकर्षाने जाणवत आहे. सुपस्टार बिग बी यांनी नाना पाटेकरांचे आणि महेश मांजरेकर याचे आगमी नटसम्राट या चित्रपटासाठी तोंड भरून कौतुक केले आहे. 

आपल्या ट्विटर हँडलवर 'नटसम्राट' गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच नाना पाटेकर यांच्या अभियन आणि महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शनाबद्दल त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

यापूर्वी बिग बी झी स्टुडिओजचा मराठी चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' यातील सूर निरागस हो या गाण्याच्या प्रेमात पडले होते. त्यांनी ते गाणे ऐकल्यावर आपल्या ट्विटरवर ते गाणे शेअर केले होते. तसेच जया बच्चन या देखील 'कट्यार' पाहिल्यावर आपले अश्रू थांबवू शकल्या नव्हत्या. त्यांनी भावूक होऊन प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे आता पुन्हा बच्चन कुटुंबिय मराठीच्या प्रेमात नटसम्राटच्या माध्यमातून पुन्हा मराठीच्या प्रेमात  सूर निरागस 

मराठी सिनेमाने एक चांगली उंची गाठली आहे, असे बिग बी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

पाहू या काय म्हटले बिग बी... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.