व्हिडिओ : 'फॅशन खत्म मुझपे' म्हणत मलाईकाचा ठुमका!

'मुन्नी बदनाम हुई' फेम मलाईका अरोरा - खान पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अवतारात एका आयटम साँगमध्ये दिसणार आहे. 

Updated: Dec 26, 2014, 10:14 AM IST
व्हिडिओ : 'फॅशन खत्म मुझपे' म्हणत मलाईकाचा ठुमका! title=

मुंबई : 'मुन्नी बदनाम हुई' फेम मलाईका अरोरा - खान पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अवतारात एका आयटम साँगमध्ये दिसणार आहे. 

सोनम कपूर फेम आगामी सिनेमा 'डॉली की डॉली'मध्ये मलाईकावर एक आयटम साँग चित्रीत करण्यात आलंय. यामध्ये, 'फॅशन खत्म मुझपे' म्हणत मलाईका ठुमका लगावताना दिसणार आहे. अर्थातच, या गाण्यातही दोन मुलांची आई असलेल्या मलाईकानं आपले रंग, आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करून टाकलंय. 

गाण्याच्या बीट म्युझिक डान्सिग नंबर्सच्या लिस्टमध्ये लवकरच सामील होणार असल्याचं दिसतंय. या गाण्यात मलाईकासोबत सिनेमात  मुख्य भूमिका निभावणारा अभिनेता राजकुमार रावही ठुमके लगावताना दिसतोय. 

हे गाणं गायलंय ममता शर्मा हिनं... तर या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय अभिषेक डोगरा यांनी... अरबाझ खान प्रोडक्शन बॅनरखाली सुरु असलेला हा सिनेमा येत्या वर्षात ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.  

व्हिडिओ पाहा -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.