माधुरीसोबत बीग बीही अडचणीत, ‘नूडल्स’ भोवणार

नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानीकारक तत्त्वं आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या. 

Updated: May 31, 2015, 10:01 AM IST
माधुरीसोबत बीग बीही अडचणीत, ‘नूडल्स’ भोवणार title=

बाराबंकी : नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानीकारक तत्त्वं आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या. 

बाराबंकीचे अन्न सुरक्षा अधिकारी व्ही.के. पांडेय यांनी सांगितलं की, विभागाच्या वतीनं वरिष्ठ मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात नेस्ले इंडिया लिमिटेडची हिमाचल प्रदेश शाखा, दिल्लीच्या कनॉट सर्कल इथल्या नोंदणीकृत कार्यालय, ईझी-डे बाराबंकी, ईझी-डे दिल्ली, ईझी डेचे व्यवस्थापक मोहन गुप्ता आणि शबाब आलम यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

यापूर्वी मॅगी बाबत आलेल्या बातम्या आणि रिपोर्टमुळे आपण अस्वस्थ झालो असून त्यानंतर मी नेस्लेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं धकधक गर्ल माधुरीनं ट्विटरद्वारे सांगितलं आहे. आता बीग बींकडून प्रतिक्रिया येणं बाकी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.