मला रणबीरचा अभिमान आहे : दीपिका पादुकोण

अभिनेता रणवीर सिंग याच्या आगामी 'दिल धडकने दो' या सिनेमाविषयी अभिनेत्री दीपिका पादुकोणने कौतुक केले आहे. रणवीरचा अभिनय चांगला झालाय, असं दीपिकाने म्हटलंय.

Updated: May 30, 2015, 11:05 AM IST
मला रणबीरचा अभिमान आहे : दीपिका पादुकोण title=

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग याच्या आगामी 'दिल धडकने दो' या सिनेमाविषयी अभिनेत्री दीपिका पादुकोणने कौतुक केले आहे. रणवीरचा अभिनय चांगला झालाय. त्याचा मला गर्व आहे, असं दीपिकाने म्हटलंय.

दीपिका (२९) ने हा सिनेमा पाहिला आणि म्हटलं, रणवीरबाबत मला गर्व आहे. दीपिकाने याबाबत ट्विट केले आहे. आणि तू रणवीर हेही करु शकतोस? मला तुझा गर्व वाटतो. मी पूर्वग्रहदूषित नाही आहे. असाच ट्विट रणवीर यांनेही केला होता. दीपिकाचा 'पीकू' हा सिनेमा पाहिला. यावेळी त्याच्यासोबत अमिताभ बच्चनही होते.

दीपिकाने याआधी ट्विट करुन सिनेमाचा निर्देशक जोया अख्तर याचे कौतुक केले होते. रणवीरचा हा सिनेमा ५ जूनला रिलीज होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.