माधुरी बनली 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँन्ड अॅम्बेसेडर

धक् धक् गर्ल माधुरी दीक्षित - नेने आता 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर बनणार आहे.

Updated: Jan 22, 2015, 12:01 PM IST
माधुरी बनली 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँन्ड अॅम्बेसेडर  title=

नवी दिल्ली : धक् धक् गर्ल माधुरी दीक्षित - नेने आता 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर बनणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२२ जानेवारी) रोजी पानीपतपासून या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जनतेसमोर येणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेची सुरुवात पानीपतपासून करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये लिंगभेदाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. या मोहिमेसाठी मोहिमेची सुरुवात करण्यापूर्वी देशातील १०० जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यांत विषम लिंग गुणोत्तर मोठ्या प्रमाणावर आढळून आलंय, अशा जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

देशातील इतर भागांच्या प्रमाणात हरियाणातील १२ जिल्ह्यांत लिंग गुणोत्तर प्रमाण असंतुलित आहे. यामुळेच, या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी हरियाणाची निवड करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.