सलमान खानने मारली 50 कोटींची ‘किक‘

 सलमान खानच्या ‘किक‘ सिनेमाने 50 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई पहिल्या दोन दिवसांतच झाली आहे. किकची बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रुपयांची विक्रमी कमाई म्हटली जात आहे.

Updated: Jul 27, 2014, 10:24 PM IST
सलमान खानने मारली 50 कोटींची ‘किक‘ title=

मुंबई :  सलमान खानच्या ‘किक‘ सिनेमाने 50 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई पहिल्या दोन दिवसांतच झाली आहे. किकची बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रुपयांची विक्रमी कमाई म्हटली जात आहे.

‘किक‘ने पहिल्या दिवशी २६ कोटी रुपयांचा भरगच्च गल्ला जमविला. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारची कमाई २७ कोटींवर जाईल असा अंदाज होता. 

मात्र, ‘किक‘ने दोन्ही दिवसांचे मिळून एकूण ५० कोटी रुपये कमावले आहेत. 

सलमान खानच्या ‘जय हो‘ या मागील चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सलमानसह अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘किक‘ला जोरदार प्रतिसाद मिळाला असून, लवकरच शभंर कोटींचा टप्पा गाठू शकतो, असं म्हटलं जातंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.