कायरा दत्तनं फिल्म 'XXX'साठी न्यूडिटी कॉन्ट्रॅक्ट स्वीकारला

बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माता एकता कपूरचा आगामी चित्रपट 'XXX'साठी किंगफिशर कॅलेंडर गर्ल कायरा दत्तनं न्यूडिटी कॉन्ट्रॅक्स स्वीकारलाय. कायरानं हा कॉन्ट्रॅक्ट साइन केल्यामुळं आता तिला चित्रपटातील कोणत्याही न्यूड सिनला नाही म्हणता येणार नाही. 

Updated: Apr 27, 2015, 10:21 AM IST
कायरा दत्तनं फिल्म 'XXX'साठी न्यूडिटी कॉन्ट्रॅक्ट स्वीकारला title=

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माता एकता कपूरचा आगामी चित्रपट 'XXX'साठी किंगफिशर कॅलेंडर गर्ल कायरा दत्तनं न्यूडिटी कॉन्ट्रॅक्स स्वीकारलाय. कायरानं हा कॉन्ट्रॅक्ट साइन केल्यामुळं आता तिला चित्रपटातील कोणत्याही न्यूड सिनला नाही म्हणता येणार नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार एकता कपूरचा आगामी चित्रपट 'XXX'मध्ये बोल्डनेसच्या सर्व हद्दी तोडल्या जाणार आहेत. म्हणून यातील कलाकारांसाठी हा क्लॉज साइन करवून घेतलाय. या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की, ही एक सेक्स फिल्म आहे. त्यामुळे कोणत्याही कलाकारानं न्यूड किंवा सेमी न्यूड सिनसाठी नकार देऊ नये. न्यूड सिनसाठी बॉडी डबलची मागणी कलाकारानं करू नये आणि न्यूड सिनवरून कलाकार कोणताही वाद करू शकणार नाहीत. 

कायराचं याबाबत म्हणणं आहे, 'केन घोष दिग्दर्शक होणारे पहिले सिनेमॅटोग्राफर आणि एडिटर आहेत. मला माहितीय मी सुरक्षित हातात आहे. यात माझी भूमिका खूप रहस्यमयी आहे, मला चांगलं वाटतंय. अखेर मुली नेक्स्ट डोअर वाले रोल कधीपर्यंत करत राहतील?'

२०१६च्या अखेरीस येणाऱ्या या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालंय. पोस्टर पाहिल्यानंतर हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वात बोल्ड चित्रपट असल्याची चर्चा सुरू झालीय.

या चित्रपटाद्वारे कायरा दत्त बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. चित्रपटात ५ गोष्टी आहेत आणि प्रत्येक गोष्ट सेक्शुअलिटीच्या वेगवेगळ्या बाबींवर आधारित आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.