व्हि़डिओ : छेड काढणाऱ्यांना अद्दल कशी घडवायची? शिकवतेय तापसी

अभिनेत्री तापसी पन्नूचा, नाम शबाना हा सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तापसीने महिलांसाठी खास व्हिडिओ शेअर केलाय.

Updated: Mar 7, 2017, 01:00 PM IST
व्हि़डिओ : छेड काढणाऱ्यांना अद्दल कशी घडवायची? शिकवतेय तापसी  title=

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नूचा, नाम शबाना हा सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तापसीने महिलांसाठी खास व्हिडिओ शेअर केलाय.

व्हिडिओमध्ये खिलाडी कुमार तापसीला सेल्फ डिफेन्सचे धडे देताना दिसतोय. हा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

कुठलाही पुरुष एखाद्या स्त्रीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करतो... त्यावेळी ती त्या धक्क्यानंच स्तब्ध होते... कोणतीही प्रतिक्रिया देत नाही... त्याचाच फायदा उचलून पुरुष त्या स्त्रीसोबत काहीही करू शकतात.., आपल्या शरीराच्या अवयवांपेक्षा जास्त उपयुक्त शस्त्र नाही... त्याचाच वापर करा... आणि प्रतिक्रिया द्या... आपला हाताचा कोपरा वापरा, जोरात पोटात मारा... #mohnimaar