...आणि अनुष्कानं आपला चेहरा तळहातांत लपवला!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी आयसीसी वर्ल्डकप २०१५ च्या सेमीफायनल मॅचमध्ये विराट कोहली केवळ एक रन बनवून आऊट झाला. त्यामुळे स्टेडियमवर उपस्थित असलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काही क्षण स्तब्ध झाली होती. 

Updated: Mar 26, 2015, 10:38 PM IST
...आणि अनुष्कानं आपला चेहरा तळहातांत लपवला! title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी आयसीसी वर्ल्डकप २०१५ च्या सेमीफायनल मॅचमध्ये विराट कोहली केवळ एक रन बनवून आऊट झाला. त्यामुळे स्टेडियमवर उपस्थित असलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काही क्षण स्तब्ध झाली होती. 

अनुष्काची जी प्रतिक्रिया कोहली बाद झाल्यानंतर दिसली तीच प्रतिक्रिया साऱ्या देशवासियांची टीम इंडिया हरल्यानंतर दिसली. 

भारतीय उपकॅप्टन विराट कोहलीच्या खूप जवळची मानली जाणारी मैत्रीण अनुष्का शर्मा अत्यंत महत्त्वाची अशी सेमीफायनल मॅच पाहण्यासाठी सिडनीला दाखल झाली होती. कोहली आऊट झाल्यानंतर अनुष्का इतकी दु:खी झाली होती की यामुळे तीनं आपला चेहराच आपल्या तळहातानं लपवला. स्टेडियममध्ये असलेल्या कॅमेऱ्यानं हे संपूर्ण दृश्यं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. 

कोहलीनं भारताच्या १६ व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर मिशेल जॉनसनच्या एका बॉलवर विकेटकीपर ब्रॅड हॅडनच्या हातात कॅच सोपवली. 

मिळालेल्य माहितीनुसार, अनुष्का आणि कोहली ऑस्ट्रेलियाच्या एका रेस्टॉरन्टमध्ये एकत्र जेवतानाही दिसले होते. विराट बाद झाल्यानंतर विराट आणि अनुष्कावर अनेक व्यंग आणि जोक्स सोशल मीडियावर दिसून आलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.