कॅटरिना भेटली रणबीरच्या एका जवळच्या नातेवाईकाला...
Updated: Apr 13, 2015, 07:52 PM IST
मुंबई : बॉलिवूडचं हॉट आणि क्यूट कपल रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. माहितीनुसार रणबीरच्या फॅमिलीनेही त्यांच्या या नात्याला स्वीकारलं आहे. त्यामुळे कॅटरिना कैफ लवकरच कॅटरिना कपूर होऊ शकते.
या बातमीवर शिक्कामोर्तब तेव्हा झालं जेव्हा कॅटरिना रणबीरच्या फॅमिलीसोबत डिनर करायला गेली. हा डिनरचा कार्यक्रम मुंबईच्या रॉयल चायना हॉटेलमध्ये होता. रनबीरची आई नितू सिंग आणि आजी कृष्णा कपूरसह आणखी काही कुटुंबातील सदस्य तेथे उपस्थित होते.
डिनर झाल्यानंतर रणबीर आई आणि आजी सोबत न जाता कॅटरिनासोबत गाडीत बसून तेथून घरी गेला. रणबीर आणि कॅटरिना यांच्या नात्याला फक्त ऋषी कपूर यांची परवानगी मिळणे बाकी आहे. त्यांनी परवानगी मिळाली की हे दोघे लव्ह बर्ड लग्नाच्या बेडीत अडकण्यास तयार होतील.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.