अॅन्जेलिना जॉली होणार सातव्यांदा आई

Updated: Apr 13, 2015, 05:45 PM IST
अॅन्जेलिना जॉली होणार सातव्यांदा आई title=
वॉशिंग्टन : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अॅन्जेलिना जॉली पुन्हा एकदा आई होणार आहे. मात्र काही महिन्यांपूर्वीच कॅंसरच्या भीतीने अंडाशय काढून टाकली होती. त्यामुळे ती स्वत: आता गर्भवती राहू शकत नाही, म्हणून ती मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहे. 
 
हॉलिवूड स्टार ब्रॅड पिटसोबत ऑगस्ट २०१४मध्ये अॅन्जेलिनाने लग्न केले होते. तिचे एकूण सहा मुलं आहेत. त्यापैकी तिघांना तिने जन्म दिला आहे, तर तीन मुलांना तिने दत्तक घेतले आहे. आता अॅन्जेलिना आणखी एक मूल दत्तक घेण्याचा विचार आहे. 
 
तिने ब्रॅट पिटसोबत याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे्. संयुक्त राष्ट्राची विशेष दूत या नात्याने तिने २०१२ पासून युद्धग्रस्त सिरियाच सहा दौरे केले आहेत. त्यावेळी ती एका युद्धग्रस्थ छावणीत गेली होती. त्यावेळी तेथील मुलांची दुर्दशा पाहून तिचे अंत:करण भरून आले. दौरा करून आल्यानंतर सिरियाचं एखादं मुल दत्तक घेण्याची इच्छा तिने व्यक्त केली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.