ब्रेकअपनंतर कॅटरिनाची रणबीर कपूरवर अप्रत्यक्ष टीका

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर दोघेही सतत चर्चेत आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप का झाला हा तर गॉसिपींगचा विषय बनला आहे. पण कॅटरिनाने स्वता:च मागचं सत्य उघड केलं आहे.

Updated: Feb 1, 2016, 08:22 PM IST
ब्रेकअपनंतर कॅटरिनाची रणबीर कपूरवर अप्रत्यक्ष टीका title=

मुंबई : रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर दोघेही सतत चर्चेत आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप का झाला हा तर गॉसिपींगचा विषय बनला आहे. पण कॅटरिनाने स्वता:च मागचं सत्य उघड केलं आहे.

एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कॅटरिनाने अप्रत्यक्षपणे रणबीर कपूरवर टीका केली आहे. रणबीर हा अप्रामाणिक असल्याचं तिने अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.

कॅटरिनाने म्हटलं की, 'मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याशी प्रामाणिक असते. माझे समर्पण फक्त त्याच व्यक्तीशी असते.'

कॅटरिना पुढे म्हणाली की, 'सचोटी, विनोद आणि प्रेम ह्या आवश्यक गोष्टी आहेत. मला लबाडी आणि अनिर्णयीपणा अजिबात आवडत नाही.'

ब्रेकअपविषयी विचारले असता ती म्हणाली की, 'जे काही सुरू आहे ते फक्त अंदाज आहेत. जे काही बोलले, लिहिले जात आहे ते अवाजवी आहे. माझ्या खासगी आयुष्यावर बोलायचे नाही असे मी ठरवले आहे.'