'त्यापेक्षा मी रस्त्यावर चड्ड्या विकेन' निहलानी-मेहता वाद विकोपाला

अलिगड चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ए सर्टिफिकेट दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाला प्रसिद्धी देण्यासाठी हा वाद निर्माण केला गेल्याचा आरोप सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केला होता. 

Updated: Feb 1, 2016, 07:24 PM IST
'त्यापेक्षा मी रस्त्यावर चड्ड्या विकेन' निहलानी-मेहता वाद विकोपाला title=

मुंबई : अलिगड चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ए सर्टिफिकेट दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाला प्रसिद्धी देण्यासाठी हा वाद निर्माण केला गेल्याचा आरोप सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केला होता. 

त्याला अलिगड चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पहलाज निहलानी यांचा प्रसिद्धीसाठी वापर करण्यापेक्षा मी रस्त्यावर चड्ड्या विकेन, असं हंसल मेहता म्हणाले आहेत. मेहता यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलं आहे. 

अलिगड मुस्लिम विद्यापीठामध्ये प्राध्यापक असणारे डॉ. सिरास हे समलिंगी आहेत हे लक्षात आल्यावर त्यांना कशा प्रकारे विद्यापीठातून काढून टाकण्यात येतं. यावर आधारित अलिगड हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी यांनी प्राध्यापकाची भूमिका केली आहे.