मुंबई : नुकताच, अभिनेता 'की अॅन्ड का'मध्ये करिना कपूरशी रोमान्स करताना दिसला होता. आता तो आपल्या बहिणीसोबत म्हणजेच कतरिनासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
https://www.facebook.com/iFahhad/media_set?set=a.10206398686234552.10737...
आश्चर्य वाटू देऊ नका... कारण, कतरिना ही अर्जुनची मानलेली बहिण आहे. एकेकाळी कतरिनानं अर्जुनला राखी बांधल्याचं वृत्तही समोर आलं होतं. पण, या गोष्टीला अर्जुन कपूरनं मात्र नकार दिला होता.
ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा, कतरिना बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर झाली होती... आणि अर्जुन मात्र बॉलिवूडमध्येही दाखल झाला नव्हता. अर्जुन सलमानच्या बहिणीसोबत म्हणजेच अर्पितासोबत डेटिंग करत होता... तेव्हा सलमाननंच त्याची ओळख कतरिनाशी करून दिली होती.
'फॅटम फिल्म्स'च्या एका तेलगु रिमेकमध्ये अर्जुन कपूर आणि कतरिना कैफ हे आता जवळपास पक्क झालंय. ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.