कॉमेडी स्टार कपिल शर्माचे पाऊल घसरले, त्यांने मागितली माफी

कॉमेडी स्टार कपिल शर्मा सध्या वादात सापडलाय. मात्र, हा वाद त्याच्या कार्यक्रमाबाबत नाही. तर हा वाद आहे, असभ्य वर्तनाबाबत. दारु पिऊन महिला को-स्टारबरोबर त्यांने असभ्य वर्तन केले. ही घटना आंतरराष्ट्रीय मराठी सिनेमा महोत्सव पुरस्कार कार्यक्रमात घडली. मराठी अभियनेत्री दीपाली हिच्यासोबत डान्स करत होता. त्यावेळी त्यांने असभ्य वर्तन केले. याप्रकणी त्याने माफीही मागितलेय.

Updated: Nov 9, 2015, 04:26 PM IST
कॉमेडी स्टार कपिल शर्माचे पाऊल घसरले, त्यांने मागितली माफी title=

मुंबई : कॉमेडी स्टार कपिल शर्मा सध्या वादात सापडलाय. मात्र, हा वाद त्याच्या कार्यक्रमाबाबत नाही. तर हा वाद आहे, असभ्य वर्तनाबाबत. दारु पिऊन महिला को-स्टारबरोबर त्यांने असभ्य वर्तन केले. ही घटना आंतरराष्ट्रीय मराठी सिनेमा महोत्सव पुरस्कार कार्यक्रमात घडली. मराठी अभियनेत्री दीपाली हिच्यासोबत डान्स करत होता. त्यावेळी त्यांने असभ्य वर्तन केले. याप्रकणी त्याने माफीही मागितलेय.

कपिल जरा जास्तच ठोसली होती. त्यामुळे त्याला नशेत त्याची शुद्ध हरपली आणि त्यांने उपस्थित दीपाली सय्यद, मोनाली ठाकूर, तनीषा मुखर्जी तसेच अन्य महिला सहकाऱ्यांसोबत असभ्य वर्तन केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यावेळी कपिलची गर्लफ्रेंड प्रीती सिमोस ही सुद्धा खजिल झाली. तिने हा कार्यक्रम मध्येच सोडून गेली.

दरम्यान, या घटनांबाबत कपिल शर्माला विचारण्यात आले, त्यावेळी त्यांने स्पष्ट केले की मी मुंबईत नाही.  बाहेर आहे. मात्र, मुंबईत आल्यानंतर याबाबत स्पष्टीकरण देईन, असे सांगितले.

कपिलने स्पष्टीकरण देण्याआधीच ट्विटरवर माफी मागितलेय. माझी चूक झाली. मला माफ करा. मीही एक माणूस आहे, असे त्यांने ट्विट केलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.