हृतिकच्या त्या ट्विटवर कंगना बोलली

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनावतनं काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनचा उल्लेख सिली एक्स असा केला होता. ज्याला हृतिक रोशनं जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

Updated: Jan 30, 2016, 07:40 PM IST
हृतिकच्या त्या ट्विटवर कंगना बोलली title=

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनावतनं काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनचा उल्लेख सिली एक्स असा केला होता. ज्याला हृतिक रोशनं जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. 'मीडियानं जेवढ्या महिलांसोबत माझं नाव जोडलंय... त्यापेक्षा पोप  सोबत डेटवर जाण्याचे माझे जास्त चान्सेस आहेत' असं ट्विट हृतिकनं केलं.

 
हृतिकच्या याच ट्विटबाबत काही पत्रकरांनी कंगनाला प्रश्न विचारले, पण त्याचं उत्तर द्यायला हे ठिकाण योग्य नाही, अशी प्रतिक्रिया कंगनानं दिली आहे.