'तर तिन्ही खान गे होतील'

चित्रपटाची कथा चांगली असेल तर शाहरुख, आमिर आणि सलमान खान होमोसेक्स्युअल व्यक्तीचा रोल स्विकारण्यात कोणतीही हरकत घेणार नाही, असं वक्तव्य करण जोहरनं केलं आहे.

Updated: Jan 30, 2016, 07:08 PM IST
'तर तिन्ही खान गे होतील'  title=

मुंबई: चित्रपटाची कथा चांगली असेल तर शाहरुख, आमिर आणि सलमान खान होमोसेक्स्युअल व्यक्तीचा रोल स्विकारण्यात कोणतीही हरकत घेणार नाही, असं वक्तव्य करण जोहरनं केलं आहे.

होमोसेक्स्युअलिटी या विषयावर चित्रपट करायचा करण जोहरचा विचार आहे, तसंच या चित्रपटामध्ये या तिघांना घ्यायचाही करण प्रयत्न करत आहे, अशा चर्चा सुरु आहेत.

मनोज बाजपेयीच्या आगामी अलीगड या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. त्यावेळी करणनं ही प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात अलिगड युनिव्हर्सिटीत प्राध्यापक असलेले मनोज बाजपेयी होमोसेक्स्युअल भूमिकेत दिसणार आहेत.