मुंबई : दिग्गज अभिनेता कबीर बेदी यांनी शनिवारी त्यांच्या ७०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौथ्यांदा विवाह केला. आप्तस्वकीय, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते परवीन दुसांज हिच्याशी विवाहबद्ध झाले.
गेल्या दहा वर्षांपासून कबीर आणि परवीन एकत्र होते. सहा वर्षांपूर्वी कबीर यांनी परवीन हिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. यापूर्वी कबीर यांनी प्रतिमा, सुसान हम्फ्रेस आणि निक्की यांच्याशी विवाह झाला होता.
वाढदिवसाच्या एक दिवस आधी १५ जानेवारी रोजी कबीरचे कुटुंब आणि त्यांचे जवळचे मित्र गेटवे ऑफ इंडिया येथून स्पीडबोटद्वारे अलिबागला गेले होते. तेथे दोघांनी लग्न केले. लग्नानंतर ते गुरुद्वारामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते.