बॉक्स ऑफिसवर 'जॉली एलएलबी-2'चा डल्ला!

अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांच्या 'जॉली एलएलबी 2' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केलीय. सलग पाचव्या दिवशी या सिनेमाचे शोज हाऊसफूल्ल पाहायला मिळाले.

Updated: Feb 15, 2017, 06:47 PM IST
बॉक्स ऑफिसवर 'जॉली एलएलबी-2'चा डल्ला! title=

मुंबई : अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांच्या 'जॉली एलएलबी 2' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केलीय. सलग पाचव्या दिवशी या सिनेमाचे शोज हाऊसफूल्ल पाहायला मिळाले.

या सिनेमानं पाचव्या दिवशीपर्यंत 66.79 करोड रुपयांची कमाई केलीय. मंगळवारी व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानंही प्रेक्षकांनी या सिनेमासाठी गर्दी केलेली दिसली. 

'जॉली एलएलबी 2'नं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 13.20 करोड रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी शनिवारी 17.31 करोड, रविवारी 19.95 करोड, सोमवारी 7.26 करोड तर पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 9.07 करोड रुपयांची कमाई या सिनेमानं केलीय. 

सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये या सिनेमासाठी फारशी गर्दी दिसत नसली तरी मल्टिप्लेक्समध्ये सायंकाळी आणि रात्रीच्या शोजसाठी गर्दी दिसतेय. या सिनेमानं 100 करोड रुपयांच्या क्लबमध्ये एन्ट्री केली तर अक्षय कुमारचा शंकर करोड रुपयांची कमाई करणारा हा सलग चौथा सिनेमा ठरेल.