इट्स ऑफिशअल! अनुष्का शर्मा काम करणार सलमानच्या सुल्तानमध्ये

सुल्तानमध्ये सलमान खानसोबत काम करीत असल्याचे अनुष्का शर्माने हे उघड केले आहे. 

Updated: Jan 8, 2016, 09:37 PM IST
इट्स ऑफिशअल! अनुष्का शर्मा काम करणार सलमानच्या सुल्तानमध्ये  title=

मुंबई :  यशराज फिल्मच्या सुल्तानमध्ये सलमान खानसोबत काम करीत असल्याचे अनुष्का शर्माने हे उघड केले आहे. 

यापूर्वी, अनुष्काने आपण सुल्तानमध्ये काम करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तिने या संदर्भात मीडियामध्ये आलेल्या बातम्यांचा तिने इन्कार दिला होता. पण आता अखेर अनुष्कानेच या संदर्भात ट्विटरवर अधिकृतपणे ट्विट केले आहे. अनुष्का आता आपल्याला सलमानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सुल्तान'ची दिग्दर्शनत अली अब्बास झफर करणार आहे. 

 

सुल्तान या चित्रपटात अनुष्का एका पहेलवानाची (रेस्लर) भूमिका करत आहे. यापूर्वी हा रोल दीपिका पदुकोण आणि कंगना राणावत यांना ऑफर करण्यात आला होता. 

यापूर्वी सलमान आणि अनुष्का कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाही. आता यशराज फिल्मने ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर उतरविण्याचा विचार केला आहे.