मुंबई : शाहरुख खानच्या फिल्म 'डॉन-३' प्रियंका चोपडाला डच्चू देण्यात येणार असून तिच्या जागी कतरिना कैफ हिची एन्ट्री होऊ शकते. या चित्रपटाच्या स्क्रिट लिहिण्याचे काम सुरू असून त्याचा तिसरा भाग करण्याचा विचार सुरू आहे.
शाहरूख खान आणि फरहान अख्तर या चित्रपटावर काम करत असून चित्रपटातील 'जंगली बिल्ली' म्हणून आता प्रियंका चोपडा दिसणार नाही. या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे काही दिवसात शक्य होणार आहे.
या संदर्भात कतरिना कैफ हीने फरहान अख्तर आणि डॉन ३च्या टीमशी चर्चा केली आहे. जग्गा जासूस आणि बार बार देखो या चित्रपटांची शुटिंग संपल्यावर ती डॉन-३ च्या सेटवर दिसेल.
कतरिना जर डॉन-३मध्ये दिसली तर जब तक है जान' नंतर पहिल्यांदा शाहरूख-कतरिना एकत्र दिसणार आहे.