मुंबई : ए दिल है मुश्कील या सिनेमा रिलीजच्या तोडग्यावरुन अभिनेत्री ट्विंकल खन्नानं मनसेला लक्ष्य केलं आहे. पाकिस्तानी कलाकार सिनेमात घेतले, त्यामुळे प्रायश्चित्त म्हणून आर्मी वेलफेअरमध्ये पैसे द्यावेत, असं राज ठाकरे यांनी सुचवलं, त्यावर ट्विंकल खन्नानं जोरदार निशाणा साधला.
अशा प्रकारे पैसे जमा करणं म्हणजे खंडणी असल्याचं ट्विंकलनं म्हणलं आहे. सिनेमा तयार करणा-यांना धमकावण्याऐवजी तुमच्या पक्षातल्या लोकांचं कल्याण करा, असा सल्ला तिनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. एका वृत्तपत्रात तिनं यासंदर्भातला लेख लिहीला आहे.