२३ दिवसांत 'बाहुबली' ५०० कोटींजवळ, तर 'बजरंगी' ३०० कोटी गाठणार

स्पेशल इफेक्ट्स आणि रोमांचानं भरलेला चित्रपट 'बाहुबली' बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा आकडा गाठण्याच्या तयारीत आहे. या सुपरहिट चित्रपटानं अवघ्या २३ दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर जगभरात ४८५ कोटींची कमाई केलीय.

Updated: Aug 3, 2015, 02:30 PM IST
२३ दिवसांत 'बाहुबली' ५०० कोटींजवळ, तर 'बजरंगी' ३०० कोटी गाठणार title=

मुंबई: स्पेशल इफेक्ट्स आणि रोमांचानं भरलेला चित्रपट 'बाहुबली' बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा आकडा गाठण्याच्या तयारीत आहे. या सुपरहिट चित्रपटानं अवघ्या २३ दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर जगभरात ४८५ कोटींची कमाई केलीय.

दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांच्या दिग्दर्शनात बनलेला बाहुबली लवकरच ५०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.  

तर बाहुबलीला टक्कर देतोय सलमानचा 'बजरंगी भाईजान' . बजरंगी बॉक्स ऑफिसवर कमाईत ३०० कोटींचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत २८३.१६ कोटींची कमाई बजरंगी भाईजाननं केलीय. तर जगभरात बजरंगीनं ४०० कोटींचा टप्पा ओलांडलाय. 

कमाईमध्ये बजरंगी भाईजाननं आमीर खानच्या धूम -३ चा रेकॉर्ड मोडलाय. आता पिकेचा रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत बजरंगी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.