"मी टाईमपास म्हणून रोमान्स करण्यास तयार"

अभिनेत्री कंगना राणावतने बेधडक मत मांडलं आहे, "मी टाइमपास म्हणून रोमान्स करण्यास तयार आहे. लिव्ह इन रिलेशनशिपलाही माझी हरकत नाही". 

Updated: Jun 15, 2015, 08:10 PM IST
"मी टाईमपास म्हणून रोमान्स करण्यास तयार" title=

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने बेधडक मत मांडलं आहे, "मी टाइमपास म्हणून रोमान्स करण्यास तयार आहे. लिव्ह इन रिलेशनशिपलाही माझी हरकत नाही". 

कंगना म्हणते, जेव्हा तुम्ही टाइमपास म्हणून एखाद्याला डेट करता, त्यावेळी तुमच्या डोक्यात लग्नाचा विचार नसतो, कारण तुमच्यात या नातेसंबंधाची जाणीव नसते. मी टाइमपास म्हणून रोमांस करण्यासाठी तयार आहे असे रोखठोक मत तिने मांडले. 

लिव्ह इन रिलेशनशिपविषयीही कंगना म्हणते, मी लिव्ह इन रिलेशनशिपचे समर्थन करते. समोरचा व्यक्ती तुमच्याशी कसं वागतो यावर हे अवलंबून असते. जर दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल तर त्यांनी हे रिलेशन आणखी एक पाऊल पुढे नेण्याची गरज आहे असे तिने म्हटले आहे. 

'क्वीन, तनू वेड्स मन्नू रिटर्न्स' या चित्रपटांना घवघवीत यश मिळाल्यावर कंगना राणावतचा कट्टी बट्टी हा चित्रपट झळकत आहे. या चित्रपटात कंगनाने आधुनिक विचारसरणी असलेल्या तरुणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानिमित्त कंगनाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.