...आणि अमिताभचं नाव रेखाच्या ओठांवर आलंच!

अभिनेत्री रेखा रविवारी बिग बॉसमध्ये आपला आगामी सिनेमा ‘सुपरनानी’चं प्रमोशन करण्यासाठी दाखल झाली होती. यावेळी, तिनं होस्ट सलमान खानसोबत खूपच धम्माल केलीय.  

Updated: Oct 14, 2014, 10:35 AM IST
...आणि अमिताभचं नाव रेखाच्या ओठांवर आलंच! title=

मुंबई : अभिनेत्री रेखा रविवारी बिग बॉसमध्ये आपला आगामी सिनेमा ‘सुपरनानी’चं प्रमोशन करण्यासाठी दाखल झाली होती. यावेळी, तिनं होस्ट सलमान खानसोबत खूपच धम्माल केलीय.  

याच कार्यक्रमात, न कळत का होईना बोलता-बोलता रेखाच्या तोंडी अमिताभचं नाव आलंच... या कार्यक्रमात रेखा दबंग सिनेमातला डायलॉग आपल्या स्टाईलनं बोलत होती... ‘थप्पड से डर नही लगता... प्यार से लगता है’ हाच डायलॉग रेखानं एका छोट्या ट्विस्टसोबत सादर केला.

‘थप्पड से डर नही लगता, बिग बी से...’ असं रेखा म्हणाली आणि आपण काहीतरी चुकून बोलून गेलो असं वाटून तिनं लगेचच स्वत:ला सावरून घेतलं... आणि ‘बिग बॉस से डर लगता है’ असं म्हणत तिनं हा डायलॉग पूर्ण केला.

अगदी काही सेकंदांचा हा डायलॉग... पण यामुळे पुन्हा रेखा-अमिताभची जोडी प्रेक्षकांच्या नजरेसमोर आली. 

रेखा-अमिताभची प्रेमकहाणी नेहमीच चर्चेचा विषय ठरलीय. ही जोडी पडद्यावर शेवटी ‘सिलसिला’ या चित्रपटात एकत्र दिसली होती. यानंतर दोघांनीही एकमेकांना लांबच ठेवणं पसंत केलंय. ‘शमिताभ’ सिनेमात हीच जोडी पुन्हा एकदा दिसू शकेल, अशीही चर्चा मध्यंतरी होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.