'हॅप्पी न्यू इयर'मध्ये दिसणार शाहरुखचा अबराम!

Updated: Oct 13, 2014, 08:37 PM IST
'हॅप्पी न्यू इयर'मध्ये दिसणार शाहरुखचा अबराम! title=

 

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी 'हॅप्पी न्यू इयर' या सिनेमा 24 ऑक्टोबरला रिलीज होतोय. हा सिनेमा फराह खाननं दिग्दर्शन केला आहे.  या सिनेमात किंग खानचा  मुला 'अबराम' हा पाहूणा कलाकार म्हणून काम करणार आहे.

'अबराम'चा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. ईदच्या दिवशी किंग खाननं त्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. अबरामला एक वर्षापर्यंत मीडिया आणि लोकांपासून लपविलं होतं.  किंग खानचे सुहाना, आर्यन या दोन्ही मुलांपेक्षा 'अबराम' लहान आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.