'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चा नवीन पोस्टर रिलीज

Updated: Jun 26, 2014, 06:16 PM IST
'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चा नवीन पोस्टर रिलीज title=

 

नवी दिल्लीः अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'चा नवीन पोस्टर रिलीज झालाय. 

लीड रोलला असलेली ही जोडी पोस्टरमुळे सगळयाचे लक्ष वेधून घेताना दिसतय. 

फिल्मच्या नव्या पोस्टरमध्ये वरुण पुश-एप  करताना दिसत आहे तर आलिया त्याच्या पाठीवर बसलेली दिसली आहे. फिल्मच्या नव्या पोस्टरमध्ये ही जो़डी कमालची दिसतेय. 

'फिल्म हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'चा ऑफिशियल ट्रेलर रिलीज झालाय. 

 

 

 

फिल्मचे दिग्दर्शन शशांक खेतानने केले आहे.चित्रपट ११ जुलै ला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. 'झलक'च्या मंचावर हम्प्टी शर्मा की दुल्हनियाचे पहिलं गाणं लॉन्च होणार आहे. 

हा चित्रपट एक रोमन्टिक कॉमेडी असणार आहे. याआधी आलिया आणि वरुणने एकत्र 'स्टूडंट ऑफ द इयर'मध्ये काम केले होते. फिल्मचा ट्रेलर ही रिलीज झाला आहे. आलिया आणि वरुणची केमिस्ट्री खूप चांगली 

वाटत आहे. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.