कपिल शर्मा का करतोय असा सौदा?

टीव्ही स्टार कपिल शर्मा आता आपल्याला सौदा करतांना दिसणार आहे. हो... हा सौदा आहे कारचा... 'कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा' या कॉमेडी शोद्वारे ज्यानं सर्वांच्या मनावर ताबा मिळवला असा स्टँड अप कॉमेडियन आता अभिनेता झालाय.

Updated: Jun 26, 2014, 03:33 PM IST
कपिल शर्मा का करतोय असा सौदा? title=
फोटो सौजन्य: -@KapilSharmaK9

मुंबई: टीव्ही स्टार कपिल शर्मा आता आपल्याला सौदा करतांना दिसणार आहे. हो... हा सौदा आहे कारचा... 'कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा' या कॉमेडी शोद्वारे ज्यानं सर्वांच्या मनावर ताबा मिळवला असा स्टँड अप कॉमेडियन आता अभिनेता झालाय.

कपिल शर्मा आता त्याची पहिली वहिली जाहिरात करतोय. यात तो ऑटोमोबाईल ब्रँडचं मार्केटिंग करणार आहे. 

या जाहिरातीत कपिल एक सेल्समन आहे. शोरूमचा मॅनेजरला सेल्समननं आपल्या गाड्यांचे फिचर्स ग्राहकांना सांगायला हवंय. मात्र कपिल आपल्या नेहमीच्या पद्धतीनं तरुणींशी फ्लर्ट करतोय आणि महिला ग्राहकांना गाडीचे फिचर्सही सांगतोय. 

ही जाहिरात 'कपिलचं कॉमेडी नाईट विथ कपिल' मधलं बिट्टू शर्माचंच कॅरेक्टर दर्शवतो. कपिलच्या अॅक्टिंग आणि विनोदानं आता त्याला चांगल्या ऑफर्स येत आहेत. नुकतेच कपिलनं 3 चित्रपट साईन केले आहे. लवकरच त्याचा 'बँक चोर' नावाचा चित्रपट प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. 
कपिलला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.