व्हिडिओ : प्रत्यूषा बॅनर्जीची शेवटची शॉर्ट फिल्म

'बालिकावधू'फेम दिवंगत अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी हिची शेवटची शॉर्ट फिल्म यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलीय. 

Updated: Apr 1, 2017, 08:45 PM IST
व्हिडिओ : प्रत्यूषा बॅनर्जीची शेवटची शॉर्ट फिल्म title=

मुंबई : 'बालिकावधू'फेम दिवंगत अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी हिची शेवटची शॉर्ट फिल्म यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलीय. 

प्रत्यूषाची मैत्रिण अभिनेत्री काम्या पंजाबी हिनं हा व्हिडिओ लोकांसमोर आणलाय. प्रत्यूषाच्या पहिल्या स्मृतीदिनी काम्यानं ही शॉर्टफिल्म प्रदर्शित केलीय. प्रत्यूषानं एका वर्षापूर्वी म्हणजेच 1 एप्रिल 2016 रोजी आत्महत्या केली होती. 

योगायोग म्हणजे 'हम कुछ कह ना सके' या शॉर्टफिल्ममध्ये प्रत्युषाचा रिअल लाईफ बॉयफ्रेंडचं आणि रिल लाईफ बॉयफ्रेंडचं नाव 'राहुल' आहे. या शॉर्टफिल्ममध्ये प्रत्यूषाच्या खऱ्याखुऱ्या बऱ्याच ठिकाणी साम्य आढळतं.