अक्षय कुमारने खणला शौचायलासाठी खड्डा

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये खुप व्यस्त आहे. बॉलिवुडचा हा खिलाडी सगळीकडे याच चित्रपट आणि त्याच्या विषयाबद्दल बोलताना दिसतो.

Intern Intern | Updated: Apr 1, 2017, 07:48 PM IST
अक्षय कुमारने खणला शौचायलासाठी खड्डा title=

मुंबई : अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये खुप व्यस्त आहे. बॉलिवुडचा हा खिलाडी सगळीकडे याच चित्रपट आणि त्याच्या विषयाबद्दल बोलताना दिसतो.

याच चित्रपटाचं प्रमोशन म्हणून आणि समाजप्रबोधन म्हणून तो एका शौचालयाच्या बांधकामाकडे जाऊन पोहचला.

तिकडे त्याने शौचायलासाठी एक खड्डाही खणला. एका ट्विटमधून त्यानं हे चाहत्यांशी शेअर केलं.

चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सध्या जोरात सुरु आहे. चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानासंदर्भात आहे. यातून तो शौचालयाच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करणार आहे.

चित्रपटात त्याच्यासोबत भूमि पेडणेकर ही मुख्य भूमिका करते आहे. चित्रपट माध्यमांत चर्चेचा विषय आहे.