कंगनासोबतच्या वादावर अखेर हृतिकनं मौन सोडलं

अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रणावतचा वाद सगळ्यांनाच माहितीये. बॉलीवूडमध्ये या वादाची चांगलीच चर्चा रंगली होती.

Updated: Jul 13, 2016, 04:47 PM IST
 कंगनासोबतच्या वादावर अखेर हृतिकनं मौन सोडलं title=

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रणावतचा वाद सगळ्यांनाच माहितीये. बॉलीवूडमध्ये या वादाची चांगलीच चर्चा रंगली होती.

कंगनाने आतापर्यंत हृतिकवर अनेक आरोप केले मात्र हृतिकने आतापर्यंत या सगळ्या प्रकरणावर कुठलही स्टेटमेंट दिलं नव्हतं. बॉलिवूडमधूनही काही कलाकारांनी कंगनाला जाहीर पाठिंबा दर्शविला होता.

मात्र अखेर हृतिकने यावर आपलं मौन सोडलंय. या सगळ्या प्रकरणावर ह्रतिकने स्मार्टली उत्तर दिलं असून विजय नेहमी सत्याचाच होतो असं त्यानं म्हटलयं.