हृतिकने स्वत:लाच दिलं ७ कोटीचं गिफ्ट

रविवारी बॉलीवूडचा हँडसम स्टार रितीक रोशन याने एका हॉटेलमध्ये त्याच्या बर्थडे साजरा केला.

Updated: Jan 11, 2016, 07:08 PM IST
हृतिकने स्वत:लाच दिलं ७ कोटीचं गिफ्ट title=

मुंबई : रविवारी बॉलीवूडचा हँडसम स्टार हृतिक रोशन याने एका हॉटेलमध्ये त्याच्या बर्थडे साजरा केला. त्याच्या वाढदिवशी बॉलीवूडच्य़ा अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

हृतिकला त्याच्या चाहत्यांनी ट्विचरच्या माध्यमातून शुभेच्छा पाठवल्या तर त्याच्या घरीही गिफ्ट पाठवणाऱ्याचं प्रमाण काही कमी नव्हतं. पण हृतिकला वाढदिवशी तब्बल ७ कोटींचं गिफ्ट मिळालं आहे आणि ते कोणी दुसऱ्याने नाही तर त्यानेच ते गिफ्ट स्वत:ला दिलं आहे.

हृतिकने त्याच्या वाढदिवशी ७ कोटींची रोल्स रॉयल ही गाडी खरेदी केली. हृतिकला गाड्यांची आवड आहे. त्यामुळे त्याने वाढदिवशी गाडी खरेदी केली.