मुंबई : बॉलिवूडच्या बाजीराव आणि मस्तानीमध्ये परस्पर विरोधी सूर येऊ लागलेत. दीपिका पदुकोणने 2016 या वर्षात आपण हॉलिवूडच्या फिल्मवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं म्हटलंय.
हॉलिवूड स्टार डी. जे. कुरोसो याच्यासोबत दीपिका एका हॉलिवूडपटात झळकणार आहे.
याबाबत दोघांचा एकत्रित फोटोही सोशल मीडियावर झळकला होता. यावर रणवीर सिंगची प्रतिक्रिया मात्र काहीशी वेगळी आहे.
दीपिकाने हॉलिवूड फिल्ममध्ये काम करणार असल्याची कुठेही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे तिचा याबाबतचा निर्णय अद्याप कोणीही गृहीत धरू नये असाच काहीसा पवित्रा रणवीरने घेतलाय.
एकूणच दीपिकाच्या हॉलिवूड एन्ट्रीबाबत रणवीर आणि दीपिका या दोघांमध्येच अजून एकमत नसल्याचंच यावरून स्पष्ट झालंय.