फोटो : विद्याच्या मराठी 'एक अलबेला'चा फर्स्ट लूक

बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालन मराठी सिनेमात झळकणारे. भगवानदादांच्या जीवनावर असलेल्या एक अलबेला या मराठी फिल्ममध्ये विद्या बालन आणि मंगेश देसाई अशी जोडी दिसणारे. 

Updated: Jan 28, 2016, 10:25 AM IST
फोटो : विद्याच्या मराठी 'एक अलबेला'चा फर्स्ट लूक title=

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालन मराठी सिनेमात झळकणारे. भगवानदादांच्या जीवनावर असलेल्या एक अलबेला या मराठी फिल्ममध्ये विद्या बालन आणि मंगेश देसाई अशी जोडी दिसणारे. 

फिल्मचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.


एक अलबेला

 

शेखर सरतांडेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात भगवान दादाच्या भूमिकेत दिसणार आहे मंगेश देसाई... याशिवाय विद्याधर जोशी, प्रसाद पंडीत, स्वप्नील राजशेखर, विघ्नेश जोशी, श्रीराम कोल्हटकर, अरुण भडसावले यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. पण, या चित्रपटाचं खास आकर्षण असेल ती उलाला गर्ल विद्या बालन... विद्या पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार आहे.