जेव्हा चंबळच्या डाकूंनी लुटले खिलाडीचे सामान

‘काळ बदलायला वेळ नाही लागत’ अशी म्हण आहे. खरंच आहे एक सामान्य व्यक्ती ज्यानं कधी ट्रॅव्हल एजंसीमध्ये काम केलं, ज्वेलरी विकली, शेफ म्हणून काम केलं... तो आज बॉलिवूडचा खिलाडी आणि सुपरस्टार आहे. 

Updated: Sep 22, 2014, 03:51 PM IST
जेव्हा चंबळच्या डाकूंनी लुटले खिलाडीचे सामान title=

मुंबई: ‘काळ बदलायला वेळ नाही लागत’ अशी म्हण आहे. खरंच आहे एक सामान्य व्यक्ती ज्यानं कधी ट्रॅव्हल एजंसीमध्ये काम केलं, ज्वेलरी विकली, शेफ म्हणून काम केलं... तो आज बॉलिवूडचा खिलाडी आणि सुपरस्टार आहे. 

अक्षय कुमार... आयुष्य कुठल्या कुठं घेऊन जावू शकतं याचं एक दमदार उदाहरण. अक्षयनं आतापर्यंत १२० चित्रपट केले आहेत. नुकताच अक्षय अनुपम खेरच्या शोमध्ये सहभागी झाला होता. आपल्या आयुष्यातील अनेक किस्से त्यानं यावेळी सांगितले. 

जेव्हा चंबळच्या डाकूंनी लुटले खिलाडीचे सामान

एकदा अक्षय ‘फ्रंटीयर मेल’हून शॉपिंग करून मुंबईहून निघाला. अक्षय फॅशन स्ट्रीटहून ४-५ हजारांचं सामान घेऊन निघाला. चंबळला त्याच्या डब्यात डाकू आले. अक्षय त्यावेळी झोपून सगळं पाहात होता. त्यानं सांगितलं, “डाकू सर्वांचं सामान घेऊन जात होते. काही वेळानंतर ते माझ्याजवळ आले आणि माझं सामान उचललं. मी झोपेतच रडत राहिलो. जर मी उठलो असतो तर त्यांनी मला गोळी मारली असती. ते माझ्या सामानासोबतच चप्पल सुद्धा घेऊन गेले.”

या घटनेनंतर परिस्थिती अशी होती की, अक्षयला चपलेशिवाय दिल्ली स्टेशनवरून जावं लागलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.