मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या वादग्रस्त 'एआयबी' या कार्यक्रमाच्या वादात पुरत्या फसलेल्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण हिला कोर्टानं दिलासा दिलाय.
मुंबई हायकोर्टानं 16 मार्चपर्यंत दीपिकाच्या अटकेला स्थगिती दिलीय. 16 मार्चला या प्रकरणाचा अंतिम निकाल दिला जाईल.
'एआयबी नॉकआऊट' या कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच गदारोळ माजला होता. या व्हिडिओमध्ये करण जोहर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट यांसारखे बॉलिवूड चेहरे अश्लील शब्दांचा आणि अश्लील हावभावांचा वापर करताना दिसले होते.
या कार्यक्रमात दर्शकांमध्ये दीपिका जोरजोरात हसतानाही दिसली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी या कार्यक्रमाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली होती. यामध्ये एक नाव दीपिकाचंही आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.